नवी दिल्ली: भारतात पहिल्यांदाच वर्षात तिसऱ्यांदा त्रैमासिकात मोबाइल फोनच्या विक्रीत तीन कोटींचा आकडा पार केला आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्प (आयडीसी)च्या नुसार ही माहिती मिळाली आहे. भारतात ऑनलाइन विक्री झालेल्या फोनमध्ये सर्वाधिक लेनोव्हो स्मार्टफोनची विक्री झाली असून एकूण मोबाइल विक्रीच्या एक चतुर्थांश हिस्सा लेनोव्हाचा आहे. यानंतर शाओमीच्या क्रमांक लागतो.
आयडीसीच्या त्रैमासिक मोबाइल फोन ट्रॅकर रिपोर्टनुसार, 2016च्या तिसऱ्या त्रैमासिकात 3.23 कोटी मोबाइलची विक्री झाली असून मागिल त्रैमासिकापेक्षा 17.5 टक्के अधिक आहे.
भारतीय बाजारात ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीत सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री सर्वात जास्त झाली आहे. बाजारात सॅमसंगची सर्वाधिक 23 टक्के हिस्सा आहे. तर लेनोव्हा स्मार्टफोनचा हिस्सा 9.6 टक्के आहे. पण यामुळे मायक्रोमॅक्सला बराच धक्का बसला आहे.
आयडीसी इंडियाचे वरिष्ठ बाजार विश्लेषक कार्तिक जे यांच्या मते, 'रिलायन्स जिओ नेटवर्कमुळे 4जी स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. 10 पैकी सात ४जी स्मार्टफोनची विक्री होत आहे. ऑनलाइन विक्रीमध्ये 10 पैकी 9 स्मार्टफोन 4जी आहेत.'