नवी दिल्ली: कार मेकिंग कंपनी रेनॉल्टनं ऑटोमॅटिक 'क्विड' कार लाँच केली आहे. क्विड एएमटी (ऑटोमॅटेड मॅन्युल ट्रन्समिशन) व्हेरिएंटची किंमत 4.25 लाख आहे. 1.0 लीटर इंजिन असणाऱ्या व्हेरिएंट आरएक्सटी (ओ) मध्ये उपलब्ध आहे. स्टॅंडर्ड मॅन्युअल मॉडेलपेक्षा ही कार फक्त 30,000 रुपयानं महाग आहे.
क्विडच्या या नव्या कारची मारुतीच्या ऑल्टो के 10शी स्पर्धा असणार आहे. ऑल्टो के 10 एजीएसची किंमत 4.05 लाख एवढी आहे.
क्विडची या नव्या कारची खासियत म्हणजे क्लच फ्री ड्रायव्हिंग. गिअर ट्रान्समिशनशिवाय कारच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या कारचं इंटिरिअर देखील पूर्वीप्रमाणेच आहे. फक्त गिअर बॉक्सऐवजी डॅशबोर्ड रोटरी डायल देण्यात आलं आहे. या कारमध्ये टचस्क्रिन ऑडिओ-नेव्हिगेशन सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर, एसी आणि फ्रंट विंडोचा समावेश आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com