मुंबई : जगप्रसिद्ध फ्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांच्या 181 व्या जयंतीनिमित्त 'गूगल'नं आपल्या डूडलमधून आदरांजली दिली आहे. गूगलनं एनिमेटेड ग्राफिकच्या माध्यमातून आज आपलं डूडल ठेवलं आहे.
फर्डिनान्ड मोनोयर यांनी डायोप्टर या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणाच्या माध्यमातून लेन्सच्या क्षमतेची तपासणी करता येते. जगभरातील असंख्य नेत्ररुग्ण फर्डिनान्ड यांच्या कार्यामुळेच चांगली दृष्टी मिळवू शकले आहेत. तसंच नेत्रतज्ज्ञाकडे लावण्यात आलेला मोनोयर चार्ट फर्डिनान्ड यांनीच विकसित केला आहे.
मोनोयर यांनी विकसित केलेला डायोप्टर आणि मोनोयर चार्ट 1872 पासून जगभरात वापरला जाऊ लागला. मोनोयर चार्टमध्ये वेगवेगळ्या आकारातील अक्षरांचा वापर केलेला असतो, ज्याच्या माध्यमातून दृष्टीची क्षमता पडताळता येते.
कोण आहेत फर्डिनान्ड मोनोयर?
फर्डिनान्ड मोनोयर हे एक फ्रेंच नेत्रविशारद होते.
9 मे 1863 साली त्यांचा जन्म झाला.
फर्डिनान्ड यांनी डायोप्टरचा शोध लावला, ज्याचा उपयोग लेन्सची क्षमता पाहण्यासाठी होतो.
फर्डिनान्ड यांनी विकसित केलेल्या चार्डच्या माध्यमातून जगभरातील नेत्रविशारद रुग्णांची दृष्टी तपासतात.