न्यूयॉर्क: ज्या हॅकर्सच्या टीमनं फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं ट्विटर आणि पिनटरेस्टचं अकाउंट हॅक केलं होतं. त्याच हॅकर्सनं आता गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांचं Q&A वेबसाइट क्वोराचं अकाउंट हॅक केलं.


 

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी ही गोष्ट समोर आली. रविवारी रात्री उशीरा पिचाईचं अकाउंट हॅक केल्यानंतर ऑवरमाइन नामक एका हॅकिंग टिमनं पिचाईचं अकाउंटवरुन क्वारोवर एक मेसेज टाकला. तसेच क्वोरावरुन पिचाईंची ट्विटर अकाउंटही जोडलं. ज्यामध्ये ऑवरमाइन यांनी आपल्या हॅकिंगनं पिचाईंच्या 5,080,000 फॉलोअरपर्यंत प्रचार केला.

 
ऑवरमाइननं या महिन्यात टेक सीईओचे अकाउंट हॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. याआधील ट्विटरचे सहसंस्थापक आणि पूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी इवान बिलियम्सचं अकाउंट हॅक केलं होतं.

 
आतापर्यंत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, हे अकाउंट नेमके कसे हॅक केले जातात. तर या हॅकर्सचा दावा आहे की, ते ब्राउजरमधून वेगवेगळ्या प्रकारे पासवर्ड काढतात.

 

पिचाई यांचं क्वोरा अकाउंट हॅक झाल्यानंतर क्वोरानं आपल्या यूजर्सना पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. काही महिन्यापूर्वीच लिंक्डइनचं ही अकाउंट हॅक करण्यात आलं होतं.