Gmail Tips : कित्येकदा तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणींना किंवा ऑफिशियल कामासाठी असे काही मेल (Mail) पाठवता ज्याच्या रिप्लायची तुम्ही आतुरतेने वाट पाहता. समोरून रिप्लाय न आल्याने कासावीस होऊन तुम्ही अनेकदा इनबॉक्समध्ये जाऊन मेल चेक करता. पाठवलेल्या मेलला जर उत्तर नाही मिळालं तर तुमची चिंता वाढते. तसेच, तो मेल नक्की वाचला गेला की नाही हा देखील प्रश्न पडतो. याच समस्येपासून आज आम्ही तुम्हाला दूर करणार आहोत. आम्ही सांगितलेल्या ट्रिकमधून (Trick) तुम्हाला हे चेक करता येईल की, तुम्ही पाठवलेला मेल कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि किती वेळा वाचला गेला आहे.
मेलट्रॅक एक्सटेंशन ठेवेल तुमच्या 'मेल'वर नजर :
जर तुम्ही या फीचरचा लाभ घेऊ इच्छिता तर गुगलवर (Google) मेलट्रॅक एक्सटेंशन (MailTrack Extension) टाईप करून सर्च करा. यानंतर जी वेबसाईट (Website)ओपन होईल त्यावर मेलट्रॅक एक्सटेंशनला Add to Chrome वर क्लिक करा. या ठिकाणी एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला गुगल अकाऊंट जोडण्यास सांगितले जाईल. आता तुम्ही तुमचा ईमेल-आयडी टाईप करून गुगल अकाऊंटला जोडा. या दरम्यान, तु्म्हाला मेलट्रॅकचा ईमेलचा एक्सेस विचारला जाईल. Allow बटणावर क्लिक केल्यास तुम्ही अगदी सहजपणे तुमचे मेल ट्रॅक करू शकता.
अशा पद्धतीने करा एक्टिव्हेट Activate :
- मेलट्रॅकवर Add on ला Install केल्यानंतर मोबाईलमध्ये Gmail ओपन करा.
- Gmail ओपन केल्यानंतर नवीन मेल कंपोज करा. मेल लिहिल्यानंतर तो पाठविण्याआधी सेन्ड Send बटणाजवळ तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला ड्रॉप-डाऊन मेन्यूमध्ये Insert from Mailtrack नावाचे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर Track Email सिलेक्ट करा. सिलेक्ट बटणावर क्लिक करताच तुमची सेटिंग Activate होईल. आता तुम्ही तुमच्या पाठवलेल्या मेलला मेलट्रॅकच्या डॅशबोर्डमधून ट्रॅक करू शकता.
- Gmail च्या मोबाईल व्हर्जनमध्येसुद्धा तुम्ही हे स्टेट्स चेक करू शकता. पण यासाठी तुम्ही मेलट्रॅकचा वापर करून एखाद्या मेसेजचा रिप्लाय करणे गरजेचे आहे.
- या व्यतिरिक्त प्रत्येक ईमेलच्या खाली तुम्हाला Available add-ons ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरसु्द्धा तु्म्ही मेल ट्रॅक करू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Motorola New Smartphone : Motorola चा 200 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच बाजारात
- Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर
- Twitter New Features : आता Twitter Spaces ची करू शकता 'रेकॉर्डिंग', कंपनीने लॉन्च केले नवीन फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha