मुंबई : नेहमीप्रमाणेच एअरटेल आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कायम पुढे असते. आता देखील ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एअरटेलने 'प्लॅटिनम एक्सपिरियन्स सर्व्हिस' आणली आहे. या एअरटेल प्लॅटिनम एक्सपिरियन्समध्ये ग्राहकांना प्राधान्य देणारी 'रेड कार्पेट सेवा' मिळणार पण त्यासोबतच ग्राहकांना अनेक फायदेही मिळणार आहे.

Continues below advertisement


प्लॅटिनम एक्सपिरियन्समध्ये ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये उत्कृष्ट नेटवर्क कव्हरेजसह वेगवान 4 जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. प्लॅटिनम एक्सपिरियन्सअंतर्गत, ग्राहकांना एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राईमची एक वर्षाची विनामूल्य मेंबरशिप आणि हँडसेट प्रोटेक्शन कव्हर देखील देण्यात येणार आहे. एअरटेल बुक्ससह इतर देखील सुविधा देण्यात येणार आहे.


प्लॅटिनम एक्सपीरियन्सचा आनंद फक्त 499 रुपये प्रति महिना घेता येणार आहे.