मुंबई: रिलायन्स जिओची फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1 एप्रिलपासून जिओ आपली सेवा देण्यासाठी यूजर्सकडून शुल्क आकारणार आहे. प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. पण आता कंपनीनं आपल्या यूजर्सला एक नवी भेट दिली आहे. आता जिओ यूजर्सला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकतं.


रिलायन्स जिओच्या JIO MONEY अॅपच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. JIO नं आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरुन रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये सब्सक्रिप्शन फी आणि 303 रुपये दर महिना शुल्क द्यावं लागेल.


काय आहे ऑफर?

जर यूजर्स 99 रुपये मेंबरशिप आणि 303 रुपयाचं टेरिफ रिचार्ज केलं तर या दोन रिचार्जवर (50+50) असं 100 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. म्हणजेच तुमचे 100 रुपये तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणजे एका अर्थी तुम्हाला तुमची 99 रु. मेंबरशिप परत मिळेल. ही कॅशबॅक ऑफर असल्यानं तुम्हाला पहिले रिचार्ज करावं लागेल. त्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनीची ही ऑफर यूजर्ससाठी चांगलं डिल ठरु शकतं.

संबंधित बातम्या:

...तरीही यूजर्स 'जिओ'ची साथ सोडणार नाही: सर्व्हे