Gene Editing Technology : सध्या जीन एडिटिंग (Gene Editing) तंत्रज्ञानाची खूप चर्चा आहे. पण याबाबत बहुतेक लोकांना सविस्तर माहिती नाही. जीन एडिटिंग असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये नैसर्गिक रचनेमध्ये बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे डीएनएमध्ये (DNA) बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे डीएनएमधील काही गोष्टी काढून टाकल्या जाऊ शकतात किंवा आवश्यक गोष्टी त्यामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. एका रिपोर्टनुसार, चीन (China) गुप्तपणे जीन एडिटिंगवर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन युद्धामध्ये इतर देशांवर वरचढ ठरू शकतो. DNA मध्ये बदल करुन चीन 'हायब्रिड सैनिक' बनवत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.


काय आहे जीन एडिटिंग? ( What is Gene Editing? )


जीन एडिटिंगला 'जीनोम एडिटिंग' (Genome Editing) असंही म्हणतात. जीन एडिटिंग म्हणजे मानवी गुणसूत्रांमधील बदल. मानवी शरीरात जनुकांचा एक घटक असतो, याला जीन्स म्हणतात. जीन्सच्या समूहाला 'गुणसूत्र' म्हणतात. गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिनांची संघटित संरचना आहे. या नैसगिक संरचनेत बदल करणे म्हणजे जीन एडिटिंग. जीन एडिटिंगमध्ये डीएनएमधील गुणसूत्रं हटवली जातात किंवा वाढवली जातात.


तुम्ही जर बॉलिवूडचा 'क्रिश 3' (Krrish 3) चित्रपट पाहिला असेल, तर जीन एडिटिंग तंत्रज्ञान कशा प्रकारे काम करतं, याचा तुम्हाला अंदाज येईल. या चित्रपटामध्ये जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. या चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल की, माणूस आणि प्राण्याचे डीएनए एकत्र करुन मानव आणि प्राण्यांची मिळून अशी हायब्रिड प्रजाती 'मानवीर' तयार केले जातात. प्राण्यांच्या डीएनएमध्ये बदल करण्यात येतो, त्यामधील नको असलेल्या गोष्टी काढून त्यामध्ये हवे असलेले जीन्स वाढवले जातात. जीन एडिटिंग तंत्रज्ञानही काहीसं अशाच प्रकारे काम करतं. 


जीन एडिटिंगद्वारे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न


जगातील अनेक प्राण्यांवर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची तयारी सुरु आहे. गरज असेल तेव्हा या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रजाती वापरल्या जातील. जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर केवळ प्राण्यांवरच नाही तर वनस्पतींवरही करुन नवीन हायब्रिड (Hybrid) म्हणजे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.


चीनमुळे जगाची चिंता वाढली


दरम्यान, जीन एडिटिंगबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देश एकमेकांवर आरोप करत आहेत की, काही देश त्यांच्या सैनिकांवरही जीन एडिटिंगचा वापर करत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दोन वर्षांपूर्वी सांगितले होते की, चीन आपल्या सैनिकांवर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा करत आहे, तर ब्रिटननेही या दाव्याला समर्थन दिलं होत. चीन महासत्ता बनण्यासाठी आपल्या सैनिकांचे डीएनए बदलत असल्याचा आरोप ब्रिटनने केला होता. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


महासत्ता बनण्यासाठी चीनकडून सैनिकांवर जीन एडिटिंग


रिपोर्टनुसार, चीन आपल्या सैनिकांवर जीन एडिटिंग करत आहे. सैनिकांनाही याबद्दल माहिती दिलेली नाही. त्यामुळे सैनिकांना त्यांच्या शरीरात काय बदल होतात हे कळत नाही. डीएनएमधील बदलामुळे सैनिकांच्या शरीरात बदल होऊन त्यानंतर चिनी सैनिक सामान्य माणसांपासून भावनाहीन रोबोटमध्ये बदलत आहे. हा होणारा बदल सैनिकांना माहित नाही. चीन असे हायब्रिड सुपर सैनिक युद्धाच्या काळात निर्दयीपणे शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापरू शकतो, असेही अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत फळे, भाजीपाला आणि प्राण्यांच्या निरोगी जाती तयार करण्यासाठी जीन एडिटिंगचा वापर केला जात होता. मात्र आता हे तंत्रज्ञात मानवामध्येही वापरलं जात आहे.