काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च झालेल्या Mi 11 Lite स्मार्टफोनची भारतात विक्री आज सुरु झाली आहे. हा फोन आज प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. बर्‍याच दिवसांपासून या फोनची काही जण वाट पाहत होते, ते आता फोन ऑर्डर करू शकतात. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट व्यतिरिक्त फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 12 पासून सुरू झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या पातळ फोनवरील सेलमध्ये बऱ्याच ऑफरही देण्यात येतील. 


Mi 11 Lite स्मार्टफोनची किंमती आणि ऑफर


Mi 11 Lite स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे, तर फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 1500 रुपये डिस्काऊंट मिळेल. तसेच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही त्यावर उपलब्ध आहे.


स्पेसिफेकेशन्स


Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच यात 90 Hzचा रिफ्रेश रेट असून गोरिला ग्लास 5 चे संरक्षण आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरसह सुसज्ज असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.


कॅमेरा


कॅमेऱ्याबद्दल सांगायचं तर,  Mi 11 Lite फोनमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे. 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल टेलिफोटो-मॅक्रो लेन्स दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.


पॉवर आणि कनेक्टिव्हिटी


पॉवरसाठी फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये साइड माउंटेड केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स सारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी सारखे फीचर्स आहेत.