सियोल : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सोमवारी दक्षिण कोरियामध्ये गॅलक्सी नोट 7 च्या ग्राहकांसाठी जुन्या हँडसेटऐवजी नव्या हँडसेटची डिलिव्हरी सुरु केली आहे. गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर कंपनीने सर्व हँडसेट परत मागवले होते.


सॅमसंग कंपनीच्या माहितीनुसार, हा एक्सचेंज कार्यक्रम आजपासून (सोमवार) सुरु करण्यात आला आहे आणि जोपर्यंत सर्वांचे स्मार्टफोन बदलून दिले जात नाहीत, तोपर्यंत सुरुच राहील.

सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या ग्राहकांनी आपला जुना स्मार्टफोन परत करुन, त्याऐवजी नवीन मॉडेल मिळणार आहे किंवा ग्राहकांना नव्या स्मार्टफोनऐवजी पैसेही परत दिले जणार आहेत.

सॅमसंग गॅलक्स नोट 7 स्मार्टफोन 19 ऑगस्टला लॉन्च झाला होता आणि जगभरात 25 लाखहून अधिक हँडसेट्सची विक्री झाली होती. यामध्ये दक्षिण कोरियात 4 लाख आणि अमेरिकेत 1 लाख हँडसेट्सची विक्री झाली आहे.