- 5 इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले (1920x1080 पिक्सेल)
- 15 गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- ग्राफिक्ससाठी एड्रेना 530 जीपीयू इंटिग्रेटेड
- 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- रिअर कॅमेऱ्यामध्ये फेस डिटेक्शन, पॅनोरमा मोज, इंटेलिजेंट HDR, स्लो मोशन, व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर्स
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 3500 एमएएच क्षमतेची बॅटरी
- 4 जी एलटीई
- वाय-फाय 11 ए/बी/जी/एन/एसी
- ब्लूटूथ 1
- यूएसबी टाइप-सी पोर्ट
लेनोव्हो Z2 प्लस स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 05:05 PM (IST)
मुंबई : लेनोव्हो या प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनीच्या बहुप्रतीक्षित ‘लेनोव्हो Z2 प्लस’ स्मार्टफोनची भारतातील लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. लेनोव्हो कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगच्या इव्हेंटचं मीडिया इन्व्हिटेशन पाठवलं आहे. लेनोव्होने पाठवलेल्या इन्व्हिटेशनमध्ये लिहिलं आहे की, ‘WITNESS TOMARROW… TODAY’. येत्या गुरुवारी म्हणजे 22 सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजता लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स सोशल मीडियावर लॉन्चिंगआधीच व्हायरल झाले आहेत. गेल्या आठवड्यात लेनोव्होने एक व्हिडीओ टीझर लॉन्च करत या स्मार्टफोनमध्ये काही अॅप आधीपासूनच इन्स्टॉल असतील, अशी माहिती दिली होती. ‘लेनोव्हो Z2 प्लस’चे फीचर्स :