Foxconn India iPhone Plant : अॅपल (Apple) ची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) 12 जानेवारी रोजी आपला भारतामधील उत्पादन प्लांट पुन्हा उघडणार आहे. फॉक्सकॉन दक्षिण भारतात आपली बंद केलेली आयफोन (iPhone) उत्पादन सुविधा पुन्हा उघडणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली रॉयटर्सला आहे. तामिळनाडू राज्यात असलेला फॉक्सकॉन प्लांट डिसेंबर 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. या युनिटमधील अडिचशेपेक्षा जास्त कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे या प्लांटमधील उत्पादन बंद करण्यात आलं होतं.
तामिळनाडूमधील अॅपलची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन यांच्या आयफोन उत्पादन प्लांटमध्ये सुमारे 250 कामगारांना विषबाधा झाली. यावेळी काही वसतिगृहे आणि जेवणाचे खोली आवश्यक नियमावली पालन करत नसल्याचे आढळून आले. अन्नातून विषबाधा झाल्यानंतर कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे या प्लांटमधील उत्पादन बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर अॅपलने हा कारखाना देखरेखीखाली बंद ठेवला होता. त्यानंतर आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
अमेरिकेतील प्रमुख टेक कंपनी असलेल्या अॅपलने आयफोन 13 (iPhone 13) चे उत्पादन प्रायोगित तत्वावर सुरु केले होते. आता अॅपल भारतात सर्वच प्रमुख आयफोन मॉडेल्सची निर्मिती करण्याची चाचपणी करत आहे. कंपनीने भारतातील आयफोन 13 चे व्यावसायिक उत्पादन फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात दोन्हीसाठी सुरू करण्याची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.
याआधीच अॅपलने सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा सुरक्षित केला आहे. ज्यामुळे भारतामध्ये उत्पादनाच्या विस्ताराची योजना आखण्यात मदत झाली आहे. भारतात आयफोन 13 चे उत्पादन अॅपलला त्याच्या जागतिक बाजारपेठेत मॉडेलचा पुरवठा सुधारण्यास मदत करेल कारण भारतात जे उत्पादित केले जाते त्यापैकी 20-30% सामान्यतः निर्यात केले जातात, असे कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
- Sulli Deals : 'बुली बाई'नंतर 'सुली डिल्स' अॅप चर्चेत, जिथे रचला गेला मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याचा पहिला कट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha