सणांच्या काळात फ्लिपकार्टमध्ये 10 हजार जागांची भरती
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2016 01:47 PM (IST)
नवी दिल्लीः फ्लिपकार्ट आगामी सण-उत्सवांच्या काळात 10 हजार कंत्राटी कामगारांची भरती करणार आहे. ग्राहकांना जलद सेवा पुरवता यावी, यासाठी लॉजिस्टीक आणि डिलीव्हरीसाठी कंत्राटी कामगारांची भरती करण्याचा निर्णय फ्लिपकार्टने घेतला आहे. सण-उत्सवांच्या काळात फ्लिपकार्टकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना जलद सेवा पुरवण्याचं उद्दीष्ट लक्षात घेता देशभरात 10 हजार कंत्राटी कामगारांची आवश्यकता आहे, अशी माहिती फ्लिपकार्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी नितीन सेठ यांनी दिली. फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपडीलनेही 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 10 हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्याचं जाहीर केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी फ्लिपकार्टनेही तत्परता दाखवली आहे.