मुंबई : सॅमसंगने आपल्या आगामी गॅलेक्सी फोल्डर 2 ची अधिकृत घोषणा केली आहे. सध्याच्या बारफोनच्या ट्रेंडपेक्षा हा फोन वेगळा बनवण्यात आला आहे.
सॅमसंगच्या या फ्लिप फोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये बाजारात आणला जाईल, त्यानंतर जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये उतरवला जाईल.
सॅमसंगने मागच्याच वर्षी गॅलेक्सी फोल्डर हा फोन बाजारात आणला होता. त्याच सीरिजमधील गॅलेक्सी फोल्डर 2 लवकरच लॉन्च केला जाणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी फोल्डरचे फीचर्स :
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड मार्शमेलो 6.0
रॅम : 2 जीबी
बॅटरी : 1950 mAh
कॅमेरा : रिअर 8 मेगापिक्सल आणि फ्रंट 5 मेगापिक्सल
डिस्प्ले : 3.8 इंच, 480x800 पिक्सल रिझॉल्यूशन
प्रोसेसर : 1.4 GHz क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
मेमरी : 16 जीबी, 128 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल
इतर फीचर्स : 4 जी, जीपीएस, वायफाय