नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर आजपासून सुपर व्हॅल्यू वीक सुरु झाला आहे. या सुपर व्ह्यल्यू वीकमध्ये गुगल पिक्सल 2, मोटो X4, शाओमी रेडमी नोट 5, आईफोन X,आईफोन 8 वर बंपर ऑफर मिळत आहे. बायबॅक ऑफरमध्ये Google Pixel2 हा 70 हजाराचा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयांना मिळत आहे. तर मोटो X4 हा 6,999 रुपयांना उपलब्ध आहे.
बायबॅक ऑफर अर्थात ठराविक मुदतीत फोन परत करण्याच्या अटीवर ही भरघोस सूट देण्यात येत आहे. ही ऑफर 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे.
Google Pixel2 अवघ्या 10,999 रुपयात
गुगल पिक्सल 2 (128 जीबी) या फोनची किंमत 70 हजार रुपये आहे. मात्र बायबॅक ऑफरनुसार फ्लिपकार्टवर तो अवघ्या 10 हजार 999 रुपयांना मिळणार आहे.
बायबॅक म्हणजे तुम्ही फोन खरेदी केल्यानंतर कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत तो परत करणे होय.
बायबॅक ऑफर
फ्लिपकार्टने बायबॅक ऑफरसह अनेक ऑफर दिल्या आहेत.
Google Pixel2 या फोनवर थेट 9,001 रुपयांची सूट दिली जात आहे. जर एचडीएफसी बॅंकेच्या कार्डने फोन खरेदी केल्यास 5 टक्के म्हणजेच 8 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. या दोन्ही सवलती लागू केल्यास 70 हजारांचा गूगल पिक्सल 2 थेट 52,999 रुपयांनी मिळणार आहे. यानंतर फ्लिपकार्ट या फोनवर 42 हजार रुपयांची बायबॅक ऑफर देत आहे. या सगळ्या ऑफर्स एकत्र केल्यास फोनची किंमत अवघी 10,999 रुपये एवढी होत आहे.
Moto X4 6999 रुपयांना
बायबॅक ऑफरनुसार 22,999 रुपयांचा मोटो X4 फ्लिपकार्टवर 6,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात मोटो X4 वर फ्लिपकार्ट 16 हजार रुपयांची बायबॅक ऑफर देत आहे. यासाठी युजर्सना 199 रुपयांची बायबॅक गॅरेंटी पॉलिसी घ्यावी लागणार आहे.
या बायबॅक ऑफरनंतर मोटो X4 हा फोन 6,999 रुपयांना मिळेल. बायबॅक गॅरेंटीनुसार ग्राहक कंपनीला फोन परत करतील तेव्हा या त्यांचा 16 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.
फ्लिपकार्टवर बायबॅक सेल, 70 हजाराचा स्मार्टफोन 10,999 रुपयांत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2018 08:43 AM (IST)
बायबॅक ऑफर अर्थात ठराविक मुदतीत फोन परत करण्याच्या अटीवर ही भरघोस सूट देण्यात येत आहे. ही ऑफर 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -