मुंबई : हल्ली कोणत्याही माहितीसाठी सर्वात आधी गूगलचा आधार घेतला जातो. गूगलवर सर्व माहिती उपलब्धही असते. त्यामुळे अनेकजण गूगलचा आधार घेतात. मात्र, गूगलवर अशाही काही गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं तुम्ही टाळलं पाहिजे.

 

  1. इमेल आयडी लॉग इन करुन गूगलवर सर्च करु नका. कारण यामुळे तुमचं इमेल आयडी हॅक होण्याची भीती असते. इमेल आयडी हॅक करुन दुरुपयोग केला जातो.


 

  1. गूगलवर संशयास्पद गोष्टींबाबत सर्च करु नका. कारण सायबर पोलिसांची नजर अशा लोकांवर अधिक असते.


 

  1. गूगल सर्चमध्ये एक अशी सुविधा असते, ज्या माध्यमातून तुमच्या सर्चनुसार जाहिरात दाखवली जाते. कारण गूगलकडे तुमच्या सर्च हिस्ट्रीचा पूर्ण डेटाबेस असतो. यामुळे तुमची माहिती लीक होण्याची भीती असते. शिवाय, सर्चनुसार जाहिरातींचा भडीमारही केला जातो.


 

  1. औषधांसंबंधी कोणतीही माहिती तुम्ही जेव्हा गूगलवर सर्च करता, त्यावेळी ती माहिती थर्ड पार्टीला ट्रान्स्फर केली जाते. याआधारे तुम्हाला उपचारासंबंधी औषधांच्या जाहिराती दाखवल्या जातात. शिवाय, मेडिकलची माहिती क्रिमिनल वेबसाईट्सकडे जाण्याची भीती असते.