मुंबई : शाओमीने यावर्षी लाँच केलेल्या रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रोला भारतीय बाजारात तुफान प्रतिसाद मिळतोय. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या फोनसाठी ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे. फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टने मोठी ऑफर दिली आहे, ज्यामुळे यापैकी कोणताही एक फोन 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.


अकरा हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर

दोन्ही फोनवर अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटही दिला जात आहे. तर एक्स्चेंज ऑफरमध्ये अकरा हजार रुपयांपर्यंतची सूट आहे.

रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये 64GB आणि 32GB व्हेरिएंटचा समावेश आहे. यांची किंमत अनुक्रमे 11 हजार 999 रुपये आणि 9 हजार 999 रुपये आहे. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत 11 हजार 999 रुपये किंमत असणाऱ्या फोनवर अकरा हजार रुपयांपर्यंत सूट आहे, ज्यामुळे हा फोन केवळ 999 रुपयात मिळेल.

दुसरं व्हेरिएंट 32GB चं आहे. 9 हजार 999 रुपये किंमतीच्या या फोनवर नऊ हजार रुपयांपर्यंत सूट आहे. त्यामुळे हा फोन केवळ 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतो. एक्स्चेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमचा जुना फोनही चांगला असणं गरजेचं आहे.

रिलायन्स जिओ आणि अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खास ऑफर

अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड युझर्ससाठी पाच टक्के अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे. तर ईएमआयची सुरुवात 582 रुपये प्रति महिना यापासून आहे.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 2200 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. कॅशबॅक 50 रुपये आणि 44 रुपयांच्या व्हाऊचर्समध्ये मिळेल. 198 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केल्यास कॅशबॅक थेट युझर्सच्या माय जिओ अकाऊंटमध्ये जमा होईल, ज्यानंतर रिचार्जच्या माध्यमातून कॅशबॅक वापरता येईल.