मुंबई : सॅमसंगने Galaxy S Light Luxury हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. S लाइट हा S8चं मिनी व्हर्जन आहे. चीनमधील एका वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे.
किंमत :
गॅलक्सी S लाइट हा चीनमधील JD.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 3,999 युआन (जवळपास 40,000 रुपये) आहे.
गॅलक्सी S लाइट लक्झरी स्मार्टफोनचे खास फीचर्स :
ड्युल सिम कार्ड असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओ ओएसवर आधारित आहे. यामध्ये 5.8 इंच स्क्रिन असून यांचं रेझ्युलेशन 1080x2220 पिक्सल आहे. यामध्ये 2.2 GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रगन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
यासोबतच वायफाय, जीपीएस, तसंच 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आलं आहे.
सॅमसंगचा Galaxy S Light Luxury स्मार्टफोन लाँच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2018 03:45 PM (IST)
सॅमसंगने Galaxy S Light Luxury हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. S लाइट हा S8चं मिनी व्हर्जन आहे. चीनमधील एका वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -