मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टचा 'बिग बिलयन सेल' आजपासून (बुधवार) सुरु झाला आहे. हा सेल 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गारमेंट, मोबाइलसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय यासारख्या अनेक ऑफर आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.
या बंपर सेलमध्ये टीव्ही, एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या अनेक वस्तूंवर तब्बल 70% सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये मोटोरोला, एचटीसी, सॅमसंग ब्राँड्सच्या स्मार्टफोनवरही डिस्काउंट देण्यात आलं आहे. याशिवाय यामध्ये अॅपल आयपॉड, स्मार्टवॉच, सोनी प्ले स्टेशन यावरही अनेक ऑफर आहेत.
यासोबतच सेलच्या पहिल्याच दिवशी 12 हजारात 32 इंच एलईडी टीव्ही खरेदी करता येणार आहे. वीयू कंपनीचा हा टीव्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर खरेदी करता येईल. फॅशन आणि गारमेंटच्या तब्बल 500 प्रोडक्टचा या सेलमध्ये समावेश असणार आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टच्या या सेलनंतर अमेझॉनवर देखील उद्यापासून सेल सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी पर्वणीच आहे.