वोल्व्हो ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्लिस फ्रंप यांनी याबाबत बोलताना सांगितल की, 'भारताच्या कार बाजारात वोल्व्होचा हिस्सा पाच टक्के आहे. 2020 पर्यंत यात दुप्पट वाढ व्हावी यासाठी आम्ही नवी योजना तयार करत आहोत. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मेड-इन-इंडिया प्रोडक्टची भूमिका महत्त्वाची असणार आहे.’
वोल्व्होच्या कार भारतात तयार झाल्यास त्यांच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होऊ शकते. भारतात कार तयार केल्यास येत्या काळात वोल्व्होच्या कारची मागणी वाढू शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com