फ्लिपकार्टच्या 'बिग दिवाळी सेल'ची तारीख ठरली!
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2017 01:13 PM (IST)
फ्लिपकार्टने 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान बिग दिवाली सेलचं आयोजन केलं आहे.
मुंबई : फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. टीव्ही आणि अॅप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट आणि एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. फोन पेवरुन पेमेंट केल्यास 20 टक्के कॅशबॅक (200 रुपयांपर्यंत) मिळेल. काही स्मार्टफोनवर भरघोस सूट असेल. तर बजाज फिनसर्व्हसोबत मिळून फ्लिपकार्ट 4 लाख फोनवर नो कॉस्ट ईएमआय देणार आहे. या फोनवर सूट मिळणार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये टॉप 3 फोनची निवड करण्यात येणार आहे. रेडमी नोट 4, लेनोव्हो K8 प्लस आणि शाओमी रेडमी नोट 4 हे फोन ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार टॉप 3 फोनमध्ये असतील. स्वस्त फोनमध्ये मोटो सी प्लस, मोटो ई 4 प्लस आणि सॅमसंग गॅलक्सी J7-6 हे फोन आहेत. तर टॉप 3 प्रीमिअम स्मार्टफोनमध्ये आयफोन 6, आयफोन 7 आणि सॅमसंग गॅलक्सी एस 7 या फोनचा समावेश आहे. फ्लॅश सेलमध्ये काय मिळणार? सेलच्या काळात दररोज दुपारी 12 वाजता फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात येणार आहे. पहिला सेल पॅनासॉनिक एल्युगा रे X चा असेल, जो 2 हजार रुपयांनी स्वस्त म्हणजे 6 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 14 ऑक्टोबरला ऑनर 9i चा पहिला सेल असेल. शिवाय एक्स्चेंज ऑफरमध्ये रेड मी नोट 3, सॅमसंग गॅलक्सी J7, मोटो G3, लेनोव्हो K4 नोट आणि आयफोन 5s फोनच्या बदल्यात जास्तीची सूट देण्यात येणार आहे.