मुंबई: आयफोन 7बाबत सोशल मीडियावर आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात हायटेक फोन असणार आहे. हा सर्वात महागडा फोन असेल असा कयास आहे. पण यापेक्षाही महागडा फोन आहे. ज्याची किंमत 300 कोटीपेक्षा जास्त आहे.


 

या फोनचं का नाव falcon supernova pink diamond iphone 6 आहे. हा स्मार्टफोन 2014 मध्ये लॉन्च केला होता.
अमेरिकी लग्जरी ब्रॅण्ड फेल्कॉन आणि प्रीमियम गॅजेटसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने 3 लाख डॉलरच्या हेडफोन्सपासून अनेक महागडे गॅजेट्स तयार केले आहेत.

 

4.55 कोटी डॉलर (327 कोटी रुपये) हा आजवरचा सगळ्यात महागडा फोन आहे. यामध्ये आयफोन 6 चे सगळे फीचर्स आहेत. मोबाइल महागडा असण्याचं प्रमुख कारण म्हणजे याच्या मागे लावण्यात आलेले गुलाबी डायमंड. अॅपल लोगो आणि आयफोन एन्ग्रेविंगसाठी लावण्यात आलेले डायमंड सगळ्यात महागड्या हिऱ्यांपैकी एक आहे. या फोनची एका विमानापेक्षाही जास्त आहे. फायटर विमानाची किंमत 40 मिलियन डॉलर म्हणजे 200 कोटी आहे.

 

जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फिचर्स:

 

4.7 इंच स्क्रिन

 

1.4 GHz ड्युल कोअर प्रोसेसर

 

16, 24, 128 जीबी व्हेरिएंट

 

8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 1.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

 

एवढा महागडा कोणी खरेदी केला की नाही याबाबत काहीही डेटा उपलब्ध नाही.