मुंबई: फेरारीनं आपली पॉवरफुल स्पोर्ट्स कार 812 पहिल्यांदाच जगासमोर आणली आहे. पुढील महिन्यात जिनेवा मोटर शो-2017 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. फेरारी कारमधील आजवरची सर्वात पॉवरफुल कार एफ 12 बर्लीनेटा होती. पण आता त्याची जागा 812 सुपरफास्ट आहे.



फेरारी 812 सुपरफास्ट कारचे फीचर्स:

6.5 लीटरचं व्ही 12 इंजिन आणि 800 पीएस 718 एनएमचं टॉर्क आहे.
टॉप स्पीड 340 किमी प्रति तास

0 ते 100 किमी तास वेगासाठी अवघा 2.9 सेकंदाचा वेळ

5000 पीएसआय डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम

ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात फेरारी या वर्षी 70 वर्ष पूर्ण करणार आहे. यानिमित्तानं कंपनी 812 सुपरफास्ट ही कार लाँच करणार आहे. याचं डिझाइन 1969 साली आलेल्या फेरारी 365 जीटीबी 4शी मिळतंजुळतं आहे.



सोर्स: कार देखो डॉट कॉम





Source: cardekho.com