2017च्या सुरुवातीलाच फेसबुकची 521 अब्ज रुपये कमाई!
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 03:32 PM (IST)
सॅन फ्रान्सिस्को: फेसबुकला या वर्षात पहिल्या टप्प्यात तब्बल तीन अब्ज डॉलर एवढा नफा झाला आहे. म्हणजेच 76 टक्के नफा झाला आहे. फेसबुकनं 1.94 अब्ज यूजर्सकडून 8.03 अब्ज डॉलर (जवळजवळ 521 अब्ज रुपये) कमाई केली आहे. मागील सहा महिन्यात यूजर्सची संख्या 1.86 अब्ज आहे. यामुळेच फेसबुकच्या कमाईत दरवर्षी 49 टक्के वाढ होत आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी फेसबुक खोट्या बातम्या आणि हिंसक व्हिडिओमुळे वादात अडकलं होतं. त्यामुळे हिंसक व्हिडिओ हटवणं आणि इतर आक्षेपार्ह गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुक पुढील वर्षापर्यंत 3 हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं एका म्हटलं की, 'आमची 2017ची सुरुवात चांगली झाली आहे.' पहिल्या त्रैमासिकात फेसबुकनं तब्बल 85 टक्के कमाई मोबाइल जाहिरातीतून केली आहे.