मुंबई : सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात लॉन्च झाली आहे. GSX-R1000 असे या नव्या बाईकचं नाव असून, तब्बल 19 लाख रुपये इतकी किंमत आहे. GSX-R1000 असेही याच बाईकचं अॅडव्हान्स मॉडेलही यावेळी लॉन्च करण्यात आले आहे. मात्र, अॅडव्हान्स मॉडेलची किंमत 22 लाख रुपये आहे. बीएमडब्ल्यूच्या S1000RR ला सुझुकीच्या नव्या बाईकचं आव्हान असेल.

वजनाला हलकी, वेगवान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या बाईकमध्ये पाहायला मिळणार आहे. सुपरबाईकचा लूकही हिला देण्यात आला आहे. बाजारातील सध्याच्या सुपरबाईक्सना आव्हान देण्यासाठी MototGP रेस मशीनपासून तयार झालेलं तंत्रज्ञान यात आहे.

GSX-R1000 ही 1000 सीसीची असून, यामध्ये इनलाईन फोन इंजिन आहे. जे 197bhp क्षमतेची आणि 117 Nm टॉर्क क्षमतेचे सहा स्पीड गिअरबॉक्सही आहेत. या बाईकच्या किंमतीत सर्वोत्तम इंजिन यामध्ये देण्यात आली आहे.

मेटॅलिक ब्ल्यू आणि ब्लॅक या दोन रंगामध्ये GSX-R1000, तर GSX-R1000R मेटॅलिक ब्ल्यू आणि स्पार्कल ब्लॅकमध्ये उपबलब्ध आहे.

सध्या बाजारात असलेल्या CBR 1000RR, यमाहा YZF-R1, BMW S1000RR, एप्रिलिया RSV4-RR आणि कावासकी निंजा ZX-10R यांसोबत सुझुकीच्या नव्या बाईकची स्पर्धा असणार आहे.