Facebook Plans To Change Its Name :  तुम्ही दिवसरात्र वापरत असणाऱ्या फेसबुकचं नाव बदलण्याची शक्यता आहे. विश्वास बसत नाही ना... पण होय! हे खरं आहे... मीडिया रिपोर्ट्सनुसार, Facebook Inc कंपनी आपल्या युझर्सपुढे नव्या अवतारात येण्याची तयारीत आहे. पुढील आठवड्यात कंपनी आपलं नाव बदलण्याची योजना आखत आहे, असं The Verge ने सुत्रांच्या हवाल्यानं मंगळवारी वृत्त दिलं आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सभेत नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर करणार आहेत. लवकरच कंपनी नव्या नावाचं अनावरण करु शकते. मात्र, कंपनीच्या एका प्रवक्त्यानं यावर बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला की, कोणत्याही तर्क अथवा अफवांवर बोलू शकत नाही. 


रिपोर्टमध्ये असेही म्हटलेय की, फेसबुकसोबतच कंपनी आपले इतर प्रॉडक्ट जसे की, Instagram, WhatsApp, Oculus यांचेही नाव बदलण्याची घोषणा करु शकते.  दरम्यान, जुलैमध्ये झालेल्या earning कॉलमध्ये बोलताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, कंपनीचं भविष्य 'metaverse'मध्ये आहे. अमेरिकेतील संसदेत फेसबुकवरुन रणकंद झाल्यानंतर नाव बदलण्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील दोन्ही पक्षांनी फेसबुकवर जाहीर राग व्यक्त केला होता. हे सर्व सुरु असतानाच कंपनीनं आपल्या नावात बदल करण्यावर काम सुरु केल्याचं बोललं जात आहे. 


फेसबुक सध्या सोशल मीडियापुरतं मर्यादीत न राहाता त्यापुढे जाण्याच्या तयारीत आहे. रविवारी 18 ऑक्टोबर रोजी कंपनीनं युरोपमध्ये 10 हजार जणांनाना नोकरी देण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन कंपनीला मेटावर्स तयार करण्यात मदत मिळेल. कंपनी मेटावर्सलाही भविष्य मानत आहे. महिनाभरापूर्वीच कंपनीनं AR (augmented reality) आणि VR (virtual reality) चीफ आंद्रे बोसवर्थ यांना चीफ टेक्नोलॉजी आधिकारी म्हणून बढती देणार असल्याची घोषणा केली होती.  फेसबुकनं VR आणि AR मध्ये  मोठी गुंतवणूक केली आहे. जवळपास तीन अरब यूजर्सला जोडण्याची योजना आहे.


संबधित बातम्या :


Facebook Stock : काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं


Facebook Stock : 7 तासांचा बिघाड...44 हजार कोटींचा फटका Special Report