✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Facebook Stock : 7 तासांचा बिघाड...44 हजार कोटींचा फटका Special Report

एबीपी माझा वेब टीम   |  06 Oct 2021 12:05 AM (IST)

Facebook Stock : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) अवघ्या काही तासातच सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 45 हजार 555 कोटी रुपये गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स यांच्यानंतर पाचव्या स्थानी पोहोचला आहे. काल फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही 4.9 टक्क्यांनी घसरले आहेत. 


फेसबुकच्या शेअर्समध्ये काल 4.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीपासूनचा विचार करता फेसबुकच्या शेअर्समध्ये एकूण 15 टक्क्यांची घसरण झाली आहे अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.


फेसबुकचे शेअर्स घसरल्याने मार्क झुकरबर्गच्या संपत्तीतही घट झाली आहे. त्याची एकूण संपत्ती आता 121.6 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यामुळे तो आता बिल गेट्स यांच्या खाली पाचव्या स्थानावर ढकलला गेला आहे. एका आठवड्यापूर्वी मार्क झुकरबर्गची संपत्ती ही 140 अब्ज डॉलर्स इतकी होती असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. 


फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. 




 


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Facebook Stock : 7 तासांचा बिघाड...44 हजार कोटींचा फटका Special Report

TRENDING VIDEOS

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'18 Minutes ago

Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात21 Minutes ago

Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं51 Minutes ago

Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत1 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.