Facebook Update : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Facebook) लवकरच अनेक मोठे बदल करणार आहे, माहितीनुसार, कंपनी आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधून काही गोष्टी हटवणार आहे. 1 डिसेंबरपासून फेसबुक हा मोठा बदल करणार आहे, फेसबुकच्या या बदलानंतर तुमच्या प्रोफाईलवर कोणत्या गोष्टी दिसणार नाहीत? जाणून घ्या सविस्तर


 


 







1 डिसेंबरनंतर 'या' गोष्टी फेसबूकवर दिसणार नाहीत


माहितीनुसार, 1 डिसेंबरनंतर, तुम्हाला तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर (Interested In), धार्मिक विचार (Religious View), पत्ते (Address) आणि राजकीय विचार (Political Views) यासारख्या गोष्टी दिसणार नाहीत. दरम्यान, सध्या ही सर्व महत्वाची माहिती आता तुमच्या प्रोफाईल विभागात आणि बायोमध्ये दिसत आहे.


फेसबुकमधील हे बदल प्रथम सोशल मीडिया कन्सल्टंट मॅट नवरा (Matt Navarra) यांनी पाहिले. त्यांनी ट्विट करत या बदलांबद्दल सर्वांना सांगत एक फोटोही शेअर केला आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 1 डिसेंबर 2022 पासून फेसबुक यूजर्सच्या प्रोफाईलमधून धार्मिक दृष्टिकोन (Religious View) आणि स्वारस्य(Interested In) यांसारख्या गोष्टी हटवणार आहे.


सध्या या बदलांबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी फेसबुकवर लोकांच्या आवडीनिवडी, त्यांची धार्मिक मते, स्वारस्य आणि राजकीय विचार याबद्दल एक संपूर्ण कॉलम असायचा. पूर्वी, जेव्हा लोकं फेसबुकवर त्यांचे प्रोफाइल तयार करायचे, तेव्हा त्यांना त्यांची प्रोफाईल बनविण्यासाठी खूप वेळ लागायचा, परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे.


मेटा प्रवक्ते एमिल वाझक्वेझ (Emil Vazquez) यांनी सांगितले की, फेसबुक नेव्हिगेट करणे सोपे करण्यासाठी, आम्ही काही प्रोफाइल फील्डचे पुनर्वितरण करत आहोत, त्यासाठी आम्ही लोकांना सूचना पाठवणे देखील सुरू केले आहे. दरम्यान, मेटा कंपनी काही काळापासून आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. यामुळे कंपनीने 11 हजार लोकांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.



तुम्ही तुमची माहिती डाउनलोड करू शकता


तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमची ही माहिती फेसबुकवरून डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाइलच्या अबाऊट सेक्शनमध्ये जावे लागेल. यानंतर, तुम्हाला मूलभूत माहितीवर जावे लागेल आणि हे तपशील डाउनलोड करावे लागतील.


 


महत्वाच्या बातम्या :


Top 10 Common Password: असा पासवर्ड तुमचाही असेल तर तात्काळ बदला, अन्यथा बसेल मोठा फटका