मुंबई : सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने 2018 सालातील पहिल्या तीन महिन्यात तब्बल 58.3 कोटी फेक अकाउंट आणि पोस्ट डिलीट केल्या आहेत.


कम्युनिटी स्टँडर्ड एनफोर्समेंट रिपोर्टच्या मते, जे फेक अकाउंट आणि पोस्ट आहेत ते फेसबुकने डिलीट केले आहेत. फेसबुकने या कारवाईत 2.5 कोटी हेट स्पीच, 1.9 कोटी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. याशिवाय इतरही काही फेक पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.



दरम्यान, येत्या काळात अल्पवयीन लैंगिक शोषणासंबंधी पोस्टवर देखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे.

AI बेस्ट टूलच्या मदतीने फेसबुक कोणतंही स्पॅम आणि फेक अकाउंट बंद करु शकतं. या टूलच्या मदतीने तब्बल 98.5 टक्के फेक अकाउंटची माहिती मिळते. तर 100 टक्के स्पॅमची माहिती मिळते. असं फेसबुकचं म्हणणं आहे.