Facebook Change Its Name : तुम्ही आम्ही दिवसरात्र वापरत असणाऱ्या फेसबुक कंपनीच्या नावात बदलण्यात करण्यात आला आहे. Facebook Inc कंपनी आपल्या युझर्सपुढे नव्या रुपात समोर आली आहे. अनेक दिवसांपासून फेसबुकचे नाव बदलणार याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. फेसबुकने आपल्या नव्या नावाची घोषणा केली आहे. Facebook कंपनीचे नाव बदलून meta (मेटा) करण्यात आले आहे.
फेसबुक सध्या सोशल मीडियापुरतं मर्यादीत न राहाता त्यापुढे जाण्याच्या तयारीत आहे. 18 ऑक्टोबर रोजी कंपनीनं युरोपमध्ये 10 हजार जणांनाना नोकरी देण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन कंपनीला मेटावर्स तयार करण्यात मदत मिळेल. कंपनी मेटावर्सलाही भविष्य मानत आहे. महिनाभरापूर्वीच कंपनीनं AR (augmented reality) आणि VR (virtual reality) चीफ आंद्रे बोसवर्थ यांना चीफ टेक्नोलॉजी आधिकारी म्हणून बढती देणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकनं VR आणि AR मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जवळपास तीन अरब यूजर्सला जोडण्याची योजना आहे.
अमेरिकेतील संसदेत फेसबुकवरुन रणकंद झाल्यानंतर नाव बदलण्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील दोन्ही पक्षांनी फेसबुकवर जाहीर राग व्यक्त केला होता. हे सर्व सुरु असतानाच कंपनीनं आपल्या नावात बदल करण्यावर काम सुरु केल्याचं बोललं जात आहे.