Bajaj Pulsar 250 Launched: देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) बाजारात आज (28 आक्टोंबर) दोन धमाकेदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईक्सच्या लॉन्चिंग आधी कंपनीने अनेक टीझर प्रदर्शित केला होता. बजाज या बाईक्सला दोन व्हेरिंअटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यातील एक सेमी फेयर्ड मॉडेल आरएस 250 एफ बॅजसह लॉन्च करण्यात आले. तर, दुसरा मॉडेल एनएससह लॉन्च करण्यात आला आहे.
कंपनीने काही दिवसांपूर्वी या बाईक्सचा टीझर प्रदर्शित केला होता. ज्यात या बाईक्सची एक झलक पाहायला मिळाली होती. या बाईक्समध्ये फेअरिंग-माउंटेड रीअरव्ह्यू मिरर, स्प्लिट सीट्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, एलईडी डीआरएल आणि प्रोजेक्टर हेडलॅम्पसह सेमी फेअरिंग मिळते.
नवीन पल्सर 250 मध्ये स्प्लिट सीट सेटअप, मस्क्युलर फ्युएल टँक देण्यात आली आहे. नवीन पल्सर बाईकचे काही स्टाइलिंग घटक एनएस 200 शी जुळतात. नवीन बजाज पल्सर 250 रेंजमध्ये नवीन 249 सीसी सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 8,750 आरपीएम वर 24.5 पीएस पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 21.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. स्मूथ डाउनशिफ्टसाठी बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच आहे.
बजाजची पल्सर रेंज भारतात सर्वाधिक लोकप्रिय असून कंपनीने नवीन पल्सर एन 250 आणि एफ 250 टेक्नो ग्रे आणि रेसिंग रेड अशा दोन आकर्षक रंग पर्यायांमध्ये आणल्या आहेत. नवीन बजाज पल्सर एन 250 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1.38 लाख रुपये आहे. तर, सेमी-फेअरिंग डिझाइनसह आलेल्या बजाज पल्सर एफ 250 ची किंमत 1.40 लाख रुपये आहे.
संबंधित बातम्या-
Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? काय आहे या दोघांचं वैशिष्ट्यं
Honda Motorcycle and Scooter India : EV सेगमेंटमध्ये 'होंडा' कंपनीची एन्ट्री