नवीन Android 12 व्हर्जन आता अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. 18 मे रोजी, Android 12 सार्वजनिक बीटा लाईव्ह झाला. गुगलने आपल्या आय/ओ 2021 कीनोट दरम्यान अँड्रॉइड 12 सादर केले. या नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमची स्टेबल आवृत्ती वर्षाच्या अखेरीस येईल. काही स्मार्टफोनसाठी त्याची पहिली सार्वजनिक बीटा आवृत्ती जारी केली गेली आहे. आपण ती इंस्टॉल करुन काही फिचर्सचा अनुभव घेऊ शकता. कोणत्या फोनमध्ये Android 12 इंस्टॉल करू शकता जाणून घ्या.
Android 12 Beta 1 ला या फोनमध्ये इंस्टॉल करा
आपण Android 12 चे न्यू व्हर्जन Google Pixel 3, Pixel 3A, Pixel 3 XL, Pixel 3A XL, Pixel 4A, Pixel 4A 5G, Pixel 4, Pixel 4 XL आणि Pixel 5 मध्ये डाउनलोड करु शकता. आपल्या पिक्सेल फोनमध्ये बीटा रिलीज इंस्टॉल करण्यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसची Android 12 बीटा साइटवर नोंदणी करावी लागेल. जरी आपण Android 11 वर काम केलं असेल, तरीही आपल्याला ते पुन्हा इंस्टॉल करावे लागेल.
Android 12 Beta 1 ला असे मॅन्युअली डाउनलोड करा
नावनोंदणीनंतर, आपण आपल्या फोनमध्ये Android 12 बीटा 1 डाउनलोड करू शकता. आपण ते मॅन्युअलीही डाउनलोड करू शकता. यासाठी, आपल्याला Settings > System > System Update > Check for update वर जावे लागेल. यानंतर, बीटा रिलीजला आपल्या फोनवर येण्यासाठी थोडा वेळ लागू शकेल.
गुगलने Android 12 बीटा 1 ला काही थर्ड पार्टी स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. जर आपल्याकडे पिक्सल फोन नसेल तर आपण Android 12 ला Asus ZenFone 8, OnePlus 9, OnePlus 9 Pro, iQoo 7 Legend, Mi 11, Mi 11 Ultra, Mi 11i, Mi 11X Pro, Oppo Find X3 Pro, TCL 20 Pro 5G, Tecno Camon 17, Realme GT आणि ZTE Axon 30 Ultra 5G फोनमध्ये इंस्टॉल करु शकता.
आपण यापैकी कोणत्याही फोनमध्ये अँड्रॉइड डेव्हलपर साइटवर दिलेल्या मॅन्युफॅक्चरिंग लिंकवर क्लिक करून Android 12 चे फर्स्ट पब्लिक बीटा रिलीझ इंस्टॉल करू शकता. Google ने फेब्रुवारीमध्ये Android 12 चे पहिले डेव्हलपर प्रिव्ह्यू सादर केला. ते फक्त गुगल पिक्सेल फोनसाठी होते.
या वैशिष्ट्यांचा अनुभव घ्या
नवीन अँड्रॉइड 12 मध्ये देण्यात आलेल्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये चांगली प्रायव्हसी पॉलिसी, मटेरियल यू डिझाइन, नवीन यूआय, नवीन आयकॉन, नवीन मीडिया विजेट्स, नवीन घड्याळ अॅनिमेशन, रीडिझाइन ब्राइटनेस स्लायडर आणि इतर अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.