मुंबई: मोटोरोलाचा मोटो C प्लस हा स्मार्टफोन जून महिन्याच्या सुरुवातील लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असून याची किंमत 6,999 रुपये आहे. पण आता या स्मार्टफोनवर एक खास ऑफर देण्यात आली आहे.


या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देण्यात आली असून तब्बल 6500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळे मोटो C प्लस हा स्मार्टफोन अवघ्या 499 रुपयात मिळू शकतो.

पण एक्सचेंज ऑफरची किंमत ही प्रत्येक स्मार्टफोनच्या मॉडेलवर ठरणार आहे. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास आणखी 5 टक्के सूट मिळणार आहे.

याशिवाय या स्मार्टफोनसाठी कंपनीनं रिलायन्स जिओसोबत भागीदारी केल्यानं 30 जीबीपर्यंत फ्री डेटा मिळणार आहे.


स्पेसिफिकेशन

हा स्मार्टफोन नॉगट 7.0 ओएसवर आधारित असणार आहे. मोटो C प्लसमध्ये 5 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. यामध्ये 1.3Ghz मीडियाटेक क्वॉडकोअर कोरटेक्स A53 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढवता येणार आहे.

यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर याची बॅटरी 4000 mAh आहे.