मुंबई: नाशिकमधील अनेक उद्योजक, डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअॅप हॅक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे तुमचं व्हॉट्सअॅप सुरक्षित ठेवण्यासाठी एक खूपच सोपा उपाय आहे.


काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅपनं  टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे नवं फीचर रोल आऊट केलं होतं. हेच फीचर वापरून आपण आपलं व्हॉट्सअॅप हॅकर्सपासून सुरक्षित ठेऊ शकतात.

असं वापरा स्टेप-टू व्हेरिफिकेशन फीचर:

या सिक्युरिटी फीचरच्या वापरासाठी यूजर्सला व्हॉईसअॅपच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या अकाउंटमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करावं लागेल. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा सहा आकडी पासकोड तयार करावा लागेल. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागेल. पासकोड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येईल.

या फिचरमुळे तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट आणखी सुरक्षित होईल. कारण की, तुमचा 6 आकडी पासकोड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्ह करु शकणार नाही.



कंपनीनं या फीचरबद्दल सांगितलं की, ‘जर तुम्ही 6 आकड्यांचा पासकोड विसरल्यात तर तुम्हाला तुमच्या ईमेलवरुन व्हॉट्सअॅपला एक लिंक पाठवली जाईल. याच्या मदतीनं तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर इनअॅक्टिव्ह करु शकता.’

जर तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर इनेबल केलं आणि तुम्ही पासकोडशिवाय व्हॉट्सअॅप वापरलं तर सात दिवसांपर्यंत तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करु शकत नाही. त्यामुळे नंबर व्हेरिफाय होण्यासाठी तुम्हाला सात दिवस वाट पाहावी लागेल.

संबंधित बातम्या:

टू-स्टेप व्हेरिफिकेशन, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लाँच