SpaceX SATCOM 2 Satellite Launch : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स (SpaceX) कडून अमेरिकन सैन्यासाठी एक नवीन गुप्त मोहीम राबवण्यात आली आहे. स्पेसएक्सने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) कॅनडी स्पेस सेंटरवरून एक हेव्ही फॉल्कन रॉकेट लाँच केलं आहे. स्पेसएक्स कंपनीकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2 Mission) सॅटेलाइट लाँच करण्यात आलं आहे. हे सॅटेलाईट अमेरिकन स्पेसफोर्ससाठीचं क्लासिफाईड (USSF-67) गुप्त मिशन आहे. निवडक जण वगळता स्पेसएक्स आणि अमेरिकन सरकारला या गुप्त मोहिमेबाबत अधिकची माहिती देण्यात आलेली नाही.


स्पेसएक्सकडून SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीपासून 35 हजार किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीबाहेरील कक्षेत यशस्वीरित्या पाठवण्यात आलं आहे. हे सॅटेलाईट अमेरिकेच्या गुप्त यंत्रणेसाठी फार महत्त्वाचं आहे. SATCOM 2 हा सैन्य दलांना अधिक माहिती देऊन त्यांचा संपर्क वाढवण्यात आणि शत्रूशी दोन हात करण्यासाठी आवश्यक माहिती सेन्य दलाला पोहोचवेल. 


SpaceX चे सर्वात शक्तिशाली रॉकेट (Falcon Heavy Launch of USSF-67)


स्पेस फोर्सच्या अधिकार्‍यांनी Space.com ला दिलेल्या माहितीनुसार, CBAS-2 या मिशनचा उद्देश विद्यमान लष्करी उपग्रहांची संपर्क क्षमता वाढवणे आणि सॅटेलाईटद्वारे सतत नवीन सैन्य डेटा उपल्बध करणे हे आहे. फाल्कन हेवी रॉकेट हे SpaceX चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. आतापर्यंत या रॉकेटने 5 प्रक्षेपण आणि 11 लँडिंग केले आहे.






फॉल्कन हेवी रॉकेटची वैशिष्ट्ये


फाल्कन हेवी रॉकेट सुमारे 64 मेट्रिक टन कक्षेत पोहोचू शकतो. USSF-67 या सॅटेलाईटचे वजन 18,747 विमानांच्या वजनाएवढे आहे. नुकताच SpaceX ने एक व्हिडीओ शेअर करत नुकत्याच लाँच झालेल्या मिशनची माहिती दिली आहे.  फाल्कन 9 रॉकेटच्या पहिल्या स्टेजवर कॅमेरा बसवण्यात आला आहे. या लाँचचा संपूर्ण व्हिडीओ स्पेसएक्सने शेअर केला आहे.


7,500 सॅटेलाईट्स प्रक्षेपणाची परवानगी


याशिवाय SpaceX ने नुकतेच 54 नेक्स्ट जनरेशन स्टारलिंक इंटरनेट सॅटेलाइट्स देखील लाँच केले आहेत. स्पेसएक्सचे हे उपग्रह फार महत्त्वाचे आहेत. हे सॅटेलाईट्स पहिल्या पिढीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. हे सॅटेलाईट्स जास्त प्रमाणात इंटरनेट ट्रॅफिक नियंत्रित करू शकतात. यामुळे लोकांच्या थेट त्यांच्या स्मार्टफोनवर सॅटेलाइट इंटरनेट सेवा पोहोचवू शकते. या उपग्रहांना 'जनरल 2' असेही म्हटले जात आहे. SpaceX ला असे 7,500 सॅटेलाईट्स लाँच करण्यासाठी अमेरिकन सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यापूर्वीही 54 उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या


NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?