मुंबई: व्हॉट्सअॅपवर अनेकदा बरेच फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल अनेकदा शेअर केलं जातं. अशा फाईल्सवर आपणही अनेकदा सहजपणे क्लीक करतो. पण आता असं करणं तुम्हाला फारच महागात पडू शकतं.
व्हॉट्सअॅपवर बनावट एक्सल फाईलच्या आधारे बँक अकाउंटची माहिती चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरील अनेक लिंकमध्ये व्हायरस असतं. याचाच हॅकर्सनं वापर करुन यूजर्सची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हॉट्सअॅपवर NIA आणि NDAची फाईल आली असल्याची बतावणी केली जाते. यामध्ये ‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि ‘NIA-selection-order-.xls’. या लिंक दिसून येतात. त्यामुळे या फाईल एनडीए किंवा एनआयएची असल्याचं यूजर्संना वाटतं. त्यावर क्लिक केल्यास मात्र, तुमचं बरंच नुकसान होऊ शकतं.
या बनावट फाइलवर क्लिक केल्यास यूजर्सच्या स्मार्टफोनमधील बँकेच्या ऑनलाईन अकाउंट आणि पीन क्रमांक सहजपणे चोरीला जातो. त्यामुळे वरील लिंकच्या एक्सेल किंवा पीडीएफ फाईल तुम्हाला आल्यास त्यावर अजिबात क्लिक करु नका.