मुंबई: आजच्या युगात इंटरनेटचं महत्व सांगायची गरज उरलेली नाही. अगदी लहानांपासून ते बुजुर्गांपर्यंत प्रत्येकजण या इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. फास्ट इंटरनेट मिळावं यासाठी हल्ली मोठे मोठे प्लान्स वेगवेगळ्या कंपन्यांकडून दिले जातात. मात्र अनेक ठिकाणी वाय फायच्या माध्यमातून नेट वापरलं जातं. आणि फ्री वाय-फाय म्हटलं की, अनेकांच्या यूजर्सच्या त्यावर उड्या पडतात. तात्काळ आपला मोबाइल किंवा लॅपटॉप कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करत असल्यास तुम्ही फार मोठी चूक करत आहात. यावर झालेल्या एका रिसर्चमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काही देशात केलेल्या या सर्व्हेमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांच्या वर भारतीय फ्री वाय-फाय वापरत असताना आपली आपली संवेदनशील आणि खासगी माहिती इंटरनेटवर टाकतात. उदा. क्रेडिट कार्डचा ऑनलाईन वापर. इंटल सिक्युरिटी इंडिया डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख वेंकट कृष्णापूर याचं म्हणण आहे की, 'अनेकदा यूजर्स संवेदशील माहितीचं आदान-प्रदान असुरक्षित वाय-फायच्या माध्यमातून करतात. त्यामुळे सायबर क्राईम वाढण्याची शक्यता आहे. कारण की यातून क्रेडिट कार्ड आणि वर्क मेलमधील माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.
भारताप्रमाणेच मेक्सिकोत 37 टक्के आणि ब्राझिलमध्ये 28 टक्के फ्री वाय-फायचा वापर करतात. 21 ते 54 वयोगटातील 1423 जणांवर हा सर्व्हे करण्यात आला. तर जागतिक पातळीवर 140000 लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला.
दरम्यान, आज काल अनेक ठिकाणी वाय फाय फ्री दिलं जातं. आपण मोठ्या आनंदाने त्याचा वापरही करत असाल. मात्र सार्वजनिक वाय-फाय वापरताना (Dont Take A Risk When Using Free Wi Fi) आपली खासगी माहिती शक्यतो शेअर करणं टाळा.
फ्री वाय-फाय वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा-
पासवर्ड नसणाऱ्या वाय-फायचा वापर करू नका.
फ्री वाय-फाय वापरत असताना कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू नका. कारण ऑनलाइन पेमेंट करताना तुम्ही जे पासवर्ड आणि बँक डिटेल्स फोनमध्ये टाकाल ते हॅकर्स हॅक करू शकतात.
वाय-फायचा वापर करताना इतर शेअरींग अॅप्सचा वापर करू नका.
कोणतेही पासवर्ड वाय-फाय सुरू असताना सेव्ह करू नका.