OnePlus 10 Pro Launch : वनप्लस (OnePlus) नव्या वर्षात ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आपला फ्लॅगशिप फोन (Flagship Phone) वनप्लस 10 प्रो (OnePlus 10 Pro) ची लॉन्चिंग करणार असल्याची घोषणा केली आहे. वनप्लसचे सीईओ पीट लाउ (Pete Lau) यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. वनप्लसचा बहुचर्चित फोन जानेवारी 2022 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान, अद्याप हा फोन कोणत्या तारखेला लॉन्च होणार याबाबत कोणतीच माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं सांदण्यात येत आहे की, कंपनी 5 जानेवारी रोजी Las Vegas मध्ये होणाऱ्या CES 2022 मध्ये एकत्रच दोन फोन लॉन्च करु शकते. यामध्ये पहिलं मॉडेल वनप्लस 10 प्रो तर दुसरं मॉडेल वनप्लस 10 असेल. दोन्ही फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया या फोनच्या फिचर्सबाबत...
दमदार कॅमेरा
वनप्लसच्या फोनबाबत जी माहिती लीक झाली आहे. त्यानुसार, यामध्ये युजर्सना दमदार कॅमेरा मिळणार आहे. म्हणजेच, फोटोग्राफी शौकीनांसाठी हा फोन खास असणार आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमरा आणि 8 मेगापिक्सल 3.3X चा टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो.
लॉन्गलास्टिंग बॅटरी आणि बॅटरीबॅकअप मिळणार
कंपनीनं या फोनच्या बॅटरीवर खास लक्ष दिल्याचं पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, या फोनमध्ये तुम्हाला 5000mAH ची बॅटरी मिळू शकते. ही 80W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
इतर फिचर्स
या फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचं तर, यामध्ये 6.7 इंच (1440x3216 पिक्सल) चा QHD डिस्प्ले मिळू शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB इंटरनल UFS 3.1 स्टोरेजसह मिळू शकतो. वनप्लस 10 प्रो IP68 रेटिंगसह बाजारात लॉन्च होऊ शकतो. हा फोन डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट असणार आहे.
या फोनशी होणार स्पर्धा
OnePlus 10 Pro च्या लॉन्चिंगनंतर या फोनची तुलना Vivo X70 Pro Plus, Xiaomi Mi 11 Ultra, Motorola Edge Plus यांसारख्या फोनसोबत होणार आहे. या फोनमध्ये देण्यात येणारे फिचर्स पाहता सर्व फोन वनप्लस 10 प्रोला टक्कर देताना दिसणार आहेत. दरम्यान, अद्याप वनप्लस 10 प्रोच्या किमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, हे सर्वच फोन 65 हजार रुपयांच्या वरच्या रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :