नव्या आयफोनची मागणी घटली, कित्येक युनिट विक्रीविना पडून
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2018 02:13 PM (IST)
विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आयफोनचे कित्येक युनिट विक्रीविना पडून आहेत.
मुंबई : अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचं समोर आलं आहे. भारतातील अनेक विक्रेत्यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. मात्र यावेळी चित्र वेगळं आहे. अॅपलने लाखांच्या संख्येने युनिट भारतात पाठवले आहेत, जेणेकरुन फोनची विक्री करताना तुटवडा निर्माण होणार नाही. पण यावेळी विक्रीही वाढलेली नाही आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे.