नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपच्या फेसबुकसोबत नंबर शेअरिंग पॉलिसीला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. हायकोर्टाने या याचिकेवर सुनावणी देताना सरकारला या पॉलिसीबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. संबंधित विभागाने 14 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.


 

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या दोन्ही पॅरेंट कंपन्या आहेत. पण नवीन धोरणासाठी युझर्सच्या अधिकारांशी तडजोड नाही करु शकत, असं याचिकेत म्हटलं आहे. करमान्या सिंह आणि श्रेया सेठी यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

 

काय आहे व्हॉट्सअॅपची नंबर शेअरिंग पॉलिसी?

 

व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सचे नंबर पॅरेंट कंपनी फेसबुकला शेअर करणार आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्स फेसबुकवरील जाहिराती पाहू शकणार आहेत. मात्र व्हॉट्सअॅपला जगभरातील एक बिलियन युझर्सला त्यांचा डेटा सुरक्षित असल्याची खात्री युझर्लला द्यावी लागणार आहे.

 

संबंधित बातमीः  फेसबुकशी व्हॉट्सअॅप नंबर शेअर करायचा नसेल तर काय कराल?