नवी दिल्ली: कॉल ड्रॉपमुळे ग्राहकांना बऱ्याचदा भुर्दंड सहन करावा लागतो. यावर तोडगा म्हणून रिलायन्स कम्युनिकेशननं अॅप-टू-अॅप कॉलिंग ही नवी स्कीम लाँच केली आहे. या स्कीममध्ये कंपनी आपल्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना अवघ्या 1 रुपयात 300 कॉलिंग मिनिटं उपलब्ध करुन देणार आहे. ज्याची व्हॅलिडिटी 30 दिवसांपर्यंत असणार आहे.

 

कंपनीनं या स्कीमला 'कॉल ड्रॉपपासून सुटका' असं नाव दिलं आहे. रिलायन्सचे बिजनेस सीईओ गुरदीप सिंह यांनी सांगितलं की, 'दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना भारतातील पहिल्या अॅप-टू-अॅप स्कीमचा फायदा मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी 30 दिवसांपर्यंत असणार आहे. अवघ्या १ रुपयात ग्राहकांना 30 दिवसासाठी दररोज 10 मिनिटं कॉलिंग टाइम मिळेल.'

 

म्हणजेच तुम्ही 1 रुपयात दररोज 10 मिनिटाच्या हिशोबानं 30 दिवसांपर्यंत 300 मिनिटं बोलू शकता. मात्र, ही डेटा कॉलिंग स्कीम आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅप आणि कॉलिंग अॅपवरुन तुम्ही फोन कॉल करु शकता.

 

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी 2002साली अस्तित्वात आली. ही देशातील चौथी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे.