मुंबई : अॅपलने वर्षातल्या आपल्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये तीन नवे आयफोन लाँच केले. ज्यामध्ये iPhone XS, iPhone XS Max, आणि iPhone XR यांचा समावेश आहे. या फोनची टक्कर आता एक महिन्यापूर्वी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट 9 सोबत केली जात आहे. त्यामुळे कोणता फोन निवडायचा हा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.
आयफोन XS मॅक्स
आयफोन XS मॅक्समध्ये 6.5 इंच आकाराची OLED स्क्रीन देण्यात आली आहे. A12 बायोनिक चिपसेट प्रोसेसर यामध्ये देण्यात आलं आहे. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये 64, 256 आणि 512 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. या फोनमध्ये ड्युअल 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल टेलीफोटो रिअर कॅमेरा आहे, तर सात मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
हा फोन आयओएस 12 सिस्टमवर काम करणार आहे. या फोनच्या स्पेशल फीचरबद्दल बोलायचं झालं, तर हा अॅपलचा पहिला फोन आहे, जो ड्युअल सिम सपोर्टेड असेल. फोनमध्ये फेस आयडी आणि वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. फोनची किंमत एक लाख नऊ हजार नऊशे रुपये आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट 9
या फोनमध्ये क्वाड एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. 10 एनएम 64 बिट ऑक्टा कोअर एग्जिनॉस 9810 प्रोसेसरवर हा फोन काम करेन. सॅमसंगच्या या लेटेस्ट फोनमध्ये सहा जीबी रॅम आणि आठ जीबी रॅमचा पर्याय आहे. तर 128 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजचा पर्याय आहे.
सॅमसंगच्या या फोनमध्ये 12 मेगापिक्सेल वाईड अँगल सेन्सर आहे. तर आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनला 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे. अँड्रॉईड ओरियो 8.1 या लेटेस्ट सिस्टमवर फोन काम करणार आहे. स्पेशल फीचरमध्ये ब्ल्यूटूथ एनेबल्ड एस पेन सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये आयरिस स्कॅनर आणि वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. फोनची किंमत 69 हजार 900 रुपये आहे.
आयफोन Xs मॅक्स वि. सॅमसंग गॅलक्सी नोट 9, कोणता फोन चांगला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2018 07:05 PM (IST)
नव्या आयफोनची फोनची टक्कर आता एक महिन्यापूर्वी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट 9 सोबत केली जात आहे. त्यामुळे कोणता फोन निवडायचा हा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -