मुंबई : कूलपॅडने भारतात स्मार्टफोनसाठी फक्त 999 रुपयांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. शुक्रवारपासून अमेझॉन इंडियावर हेडसेट ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.


 

ज्या स्मार्टफोनची स्क्रीन साईज 4.7 आणि 5.7 इंच यादरम्यान एचडी रिझॉल्युशनसोबत आहे, त्या सर्व स्मार्टफोनसाठी कूलपॅडच्या या डिव्हाईसचा वापर होऊ शकतो. रिअॅलिटी हेडसेट Note 3, Note 3 Lite आणि Note 3 Plus यांसोबतही हे डिव्हाईस यूझर्स वापरु शकतात.

 

या डिव्हाईसमध्ये कस्टमाईजेबल लेन्सचा वापर केल्याने अधिकाधिक वेळ कोणत्याही अडथळ्यांशिवाय वापर होऊ शकतो. कूलपॅड इंडियाचे सीईओ सैय्यद तजुद्दीन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “हे गॅजेट तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे आणि त्यामुळे स्वस्त दरात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. आम्ही लवकरच पॉवर बँक, स्मार्ट वॉच यांसारखे नवे प्रॉडक्ट्सही बाजारात आणणार आहोत.”