मुंबई : स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने आपल्या कूल 1 ड्यूल, कूलपॅड नोट 5 आणि कूलपॅड लाईट या तीनही स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे.


कूलपॅड कूल 1 ड्यूल (4 जीबी रॅम) : 14,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 8,999 रुपयात खरेदी करता येणार

कूलपॅड कूल 1 ड्यूल (3 जीबी रॅम) : 11,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयात खरेदी करता येणार

कूलपॅड लाईट : 11,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयात खरेदी करता येणार

कूलपॅड नोट 5 लाईट : हा स्मार्टफोन 5,999 रुपयात खरेदी करता येईल.

कूलपॅड कूल 1 ड्यूल :

हा स्मार्टफोन 2016 साली लाँच करण्यात आला होता. यामध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशन देण्यात आलं आहे. यामध्ये ऑक्टाकोअर Snapdragon 652 प्रोसेसर असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. तसंच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटही उपलब्ध आहे.

यामध्ये 13 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

कूलपॅड नोट 5 :

कूलपॅड नोट 5 मध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1920x1080 पिक्सल आहे. यामध्ये 1.5 Ghz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 4010 mAh देण्यात आली आहे.

कूलपॅड नोट 5 लाईट :

कूलपॅड नोट 5 लाईटमध्ये 5 इंच एचडी स्क्रीन देण्यात आली असून त्याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर मीडियाटेक एमटी6735 सीपी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3 जीबी रॅम आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.