मुंबई : चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी कूलपॅडने नवा स्मार्टफोन 'कॉन्जर' लॉन्च केला आहे. 'कूलपॅड कॉन्जर' स्मार्टफोन सध्या अमेरिकन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला असला, तरी लवकरच जगभरातील बाजारांमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या स्मार्टफोनची अमेरिकेतील किंमत 180 डॉलर (जवळपास 12 हजार 200 रुपये) आहे.


फीचर्स :

- 5 इंचाचा एचडी (1280x720 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले
- 1 गीगीहर्ट्झ क्वाड-कोर मीडियाटेक एमटी 6735 सीपी चिपसेट
- 3 जीबी
- 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- स्टोरेज 64 जीबीपर्यंत मायक्रो एसडीच्या सहाय्याने वाढवण्याची सुविधा
- ड्युअल सिम हायब्रिड सिम स्लॉट
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
- यूआय 8.0 ऑपरेटिंग सिस्टम

कॅमेरा :

कूलपॅड कॉन्जरमध्ये 13 मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा देण्यात आला असून, यामध्ये सेन्सर एफ/2.2 अपर्चर आहे. सेल्फीची आवड असणाऱ्यांसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरासोबत फ्लॅशही देण्यात आला आहे.

बॅटरी :

फिंगरप्रिंट सेन्सर आणि मेटल बॉडी असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 2500 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. 4 जी नेटवर्कसाठीही 30 तासांपर्यंत टॉकटाईम देण्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी :

कनेक्टिव्हिटीमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.0 आणि यूएसबी पोर्ट यांचा समावेश आहे.