मुंबई : असूसनं आपला 8 जीबी रॅमवाला झेनफोन एआऱ लॉन्च केला आहे. लास वेगासमध्ये सुरु असलेल्या CES 2017 मध्ये असूसनं आपला झेनफोन एआर आणि झेनफोन 3 झूम लॉन्च केले आहेत.

झेनफोन एआर हा जगातील दुसरा स्मार्टफोन आहे, ज्यात गूगलच्या टँगो आणि व्हर्च्यूअल रिअलिटी तसंच ऑर्ग्यूमेंटेड रिअलिटीच्या लूपमध्ये येतो. यापूर्वी लेनोवोचा फॅब 2 प्रो गूगलच्या टँगो प्रोजेक्टसोबत लॉन्च झाला होता.



असूसचा झेनफोन एआर अँड्रॉईडच्या नोगट 7.0 ने युक्त असेल. तसंच या स्मार्टफोनमध्ये व्हर्च्यूअल रिअलिटीसाठी काही खास अॅप्स देण्यात आले आहेत. गूगल डे ड्रीमचा समावेशही या स्मार्टफोनमध्ये असेल. लवकरच भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे.

झेनफोन एआर स्मार्टफोनचे फिचर्स

ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0

रॅम : 8 जीबी

डिस्प्ले : 5.7 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले 2560x1440 पिक्सेल

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोअर प्रोसेसर

कॅमेरा : 23 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट

बॅटरी : 5000 mAh

Vapor Cooling

झेनफोन 3 झूमचे फिचर्स

ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0

रॅम : 4 जीबी

डिस्प्ले : 5.5 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशन

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोअर

कॅमेरा : 13 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअर f/1.7 अपरचर

बॅटरी : 5000mAh