नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधकांच्या टीमने असं सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, ज्याद्वारे डोळ्यांच्या माध्यमातून स्मार्टफोन ऑपरेट करणं शक्य होईल. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्मार्टफोनमधील गेम्स, अॅप्स ओपन करणं किंवा इतर फीचर्सही ऑपरेट करणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे संशोधकांच्या या टीममध्ये भारतीय वंशाच्या एका पदवीधर विद्यार्थ्याचाही समावेश आहे.


 

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेटिक यांमधील संशोधकांच्या टीमने हे सॉफ्टवेअर विकसित केलं आहे.

 

गेझ कॅप्चर असं या सॉफ्टवेअरचं नाव असून, ते यूझर्स स्मार्टफोनकडे कसे पाहतात आणि आजूबाजूचं वातावरण काय आहे, याची माहिती स्टोअर करतं.

 

गेझ कॅप्चर सॉफ्टवेअरमध्ये आय ट्रॅकरही असणार आहे, ज्याद्वारे आयफोनही डोळ्यांच्या माध्यमातून ऑपरेट करता येणार आहे. हँडसेट कॅमेरा तुमचं फेस कॅप्चर करुन, यूझर्सच्या डोक्याची पोझीशन लक्षात घेतं.

 

वॉशिंग्टनच्या सिएटलमधील IEEE कॉन्फरन्समध्ये संशोधकांनी हे संशोधन मांडलं आहे.