मुंबई : शाओमीच्या अपकमिंग Mi नोट 2 स्मार्टफोनवरुन आता चर्चांना सुरुवात झाली आहे. एका नव्या लीकनुसार, या स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट असणार आहेत. याआधी अशी माहिती मिळाली होती की, या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.7 इंचाचा असेल.
लीक झालेल्या माहितीनुसार, नोट 2 स्मार्टफोन 4 जीबी व्हेरिएंटची किंमत जवळपास 25 हजार रुपये आणि 6 जीबी रॅम, 64 जीबी मॉडेलची किंमत जवळपास 30 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
‘शाओमी Mi नोट 2’मध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे, तर ड्युअल कॅमेरा सेटअप हाय-एंड डिव्हासचा भाग असणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4000 mAh असेल.
याचसोबत या स्मार्टफोनमध्ये 3D टच फिंगप्रिंट स्कॅनर, फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी असणार आहे. याआधीच्या रिपोर्टनुसार, हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरचा दावा करण्यात आला होता. शिवाय, या स्मार्टफोचं नाव Mi 5S असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.