...म्हणून मुख्यमंत्र्यांनी हळूच मोबाईल काढून हॉट-स्पॉट ऑन केला
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 09 Jun 2016 09:33 AM (IST)
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'डिजिटल महाराष्ट्र'चाही पुढाकार आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राला 'ऑनलाईन' आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. मात्र नाशिकमध्ये त्यांना इंटरनेट एररचा सामना करावा लागला. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमितील बक्षीस वितरणचा सोहळा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे मागील बाजूला उभारण्यात आलेल्या मंडपात आले. पोलीस अकॅडमीच्या ई- अॅकॅडमी या वेबसाईटचे लाँचिंग त्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर ती वेबसाईट ओपन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र 5-10 मिनिटे होऊनही ती वेबसाईट काही ओपन होईना. पत्रकारांसमोरच असं होतंय हे बघून फडणवीसांनी हळूच खिशातून आपला मोबाईल काढला आणि हॉट स्पॉटद्वारे कनेक्ट करून अखेर ती वेबसाईट ओपन केली. डोंगल प्रॉब्लेम असल्याने असा प्रॉब्लेम झाला, अन्यथा एरव्ही लगेच कनेक्ट होते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.