Laptop Buying Tips: कोरोना काळात अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत होते. यावेळी लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली होती. अनेकांना डेक्सटॅाप वर काम करण्यापेक्षा लॅपटॅाप वर काम करणे जास्त सोपे वाटते.  लॅपटॉप खरेदी करताना कोणते फिचर्स पाहावेत? असा प्रश्न अनेकांना पडतो.  लॅपटॉप खरेदी करताना जर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. नवा लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. 


बजेट 
लॅपटॉप खरेदी करत असताना सर्वांत पहिले बजेट ठरवावे. ऑनलाइन किंवा दुकानामध्ये विविध प्रकारचे लॅपटॉप मिळतात. चांगल्या प्रकारचा आणि बजेट फ्रेंडली लॅपटॉप घेण्यासाठी आपले बजेट आधीच ठरवावे.  


प्रोसेसर रॅम आणि बॅटरी  
नवा लॅपटॉप घेताना प्रोसेसर, रॅम आणि बॅटरी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला लॅपटॉप रेग्यूलर वापरासाठी हवा असेल तर इंटेल आय-३, इंटेल आय-5 आणि इंटेल आय- 7 प्रोसेसर तुमच्यासाठी योग्य आहे. 4 GB रॅमचा लॅपटॉप घ्यावा. तसेच अनेक लॅपटॉप्समध्ये  लिथियम ऑयन ही बॅटरी असते. ही बॅटरी जास्त काळ टिकते. जास्त  mAh बॅटरी असणारा लॅपटॉप खरेदी करावा. यामध्ये अधिक काळ टिकणारा बॅटरी बॅकअप मिळेल. 


Laptop हँग होतोय? मग या सोप्या पद्धतीने डिलीट करा Junk Files 


लॅपटॉपची स्क्रिन  साइज
लॅपटॉप खरेदी करत असताना स्क्रिन साइजकडे विशेष लक्ष द्यावे. तुमच्या आवडीनुसार लॅपटॉपची स्क्रिन निवडावी. 5 ते 15 इंच स्क्रिन असलेल्या लॅपटॉपला अधिक पसंती मिळते. अनेक लोक ही साइज असणाऱ्या स्क्रिनचा लॅपबटॉप निवडतात.   


Best Laptops: चांगला लॅपटॅाप घेण्याचा विचार करताय? 'हे' लॅपटॅाप कलेक्शन खास तुमच्यासाठी



कनेक्टिव्हीटी 
लॅपटॉपमध्ये साधारणपणे 2 ते 3 यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळतात. अशी यूएसबी पोर्ट असणारा लॅपटॉप नक्की घ्यावा, कारण तो  यूनिव्हर्सल असतो. या यूएसबी पोर्टमुळे तुम्ही टाईप- सी चार्जर कनेक्शन असणारा फोन लॅपटॉपला कनेक्ट करू शकता.